
बहरीनमधील मनामा येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत हिंदुस्थानने सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या कबड्डी संघात कणकवली तालुक्यातील नांदगावची सेरेना म्हसकर ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती. मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर देशभरासह नांदगाव येथील नागरिकांनी अभिनंदन केले. नांदगाव मधलीवाडी येथील मूळ रहिवासी असलेली सेरेना म्हसकर ही आपल्या कुटुंबासमवेत मुंबई भांडूप येथे राहते. तिचे वडील सचिन आणि आई मेघाली यादेखील कबड्डीपट्टू आहेत. सेरेना हिची आई मेघाली शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आहेत.





























































