
1 सोन्याचा भाव सवा लाखाच्या घरात आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे सोपे राहिले नाही. जर तुम्ही जुने सोने विकत असाल आणि सोनाराकडून कमी पैसे मिळाले तर काय कराल.
2 सर्वात आधी सोन्याची खरेदी करताना आणि विक्री करताना दागिन्याच्या शुद्धतेनुसार (पॅरेटनुसार) किंमत ठरते. वजन करताना काही घट होऊ शकते, ज्यामुळे कमी किंमत मिळते.
3 सोन्याचे बाजारभाव दररोज बदलत असतात. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी सोने विकता, त्या दिवशीचा बाजारभाव कमी असल्यास तुम्हाला कमी पैसे मिळतात.
4 सोन्याचे वजन, शुद्धता आणि इतर शुल्क याबद्दल सविस्तर माहिती घ्या. इतर ज्वेलर्स किंवा सोनार यांच्याकडून जास्त पैसे मिळतात का, हे तपासा.
5 जर तुम्ही घाईघाईने सोने विकले, तर तुम्हाला योग्य किंमत मिळण्याची शक्यता कमी असते. अनेक प्लॅटफॉर्म झटपट रोख रक्कम देतात, पण त्यांची किंमत कमी असू शकते.


























































