
तुर्कीच्या बालिकेसिर येथे सोमवारी पहाटे 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाच्या झटक्याने तीन इमारती ढासळल्या. सुदैवाने या भूकंपात जीवितहानी झालेली नसली तरी 22 लोकं जखमी झालेली आहेत.
भूकंपाचे केंद्रस्थान सिंदिरगी शहर होते. रात्री 10.48 वाजता भूकंपाची खोली 6 किलोमीटर होती. त्यानंतर अनेक झटके जाणवले. इस्तांबुल, बुरसा, मनीसा आणि इजामिरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सिंदिरगीमध्ये 3 रिकाम्या इमारती आणि एक दुमजली दुकान पडले. गृहमंत्री अली येरलिकाया यांनी ही माहिती दिली. भूकंपाने 22 लोकं जखमी झाली. बालिकेसिरचे राज्यपाल इस्माइल उस्ताओग्लूने सांगितले की, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
भूकंपाने तुर्कीतील नागरिक घाबरले असून त्यांना घरी परतायलाही भिती वाटत आहे. दरम्यान अनेक शहरांमध्ये पाऊस पडला. मस्जिदे, शाळा आणि खेळाची मैदाने मोकळी केली आहेत. सिंदरगीमध्ये ऑगस्टमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यावेळी एकाचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोकं जखमी झाली होती. त्यानंतर छोटे छोटे धक्के बसत होते.तुर्कीतील मोठा भाग हा भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने तेथे भूकंपाचे हादरे जाणवत असतात. 2023मध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप आला होता ज्यात 53 हजार लोकं मारली गेली होती. तेव्हापासून लोकांच्या मनात भूकंपाची भिती बसली आहे.




























































