पर्यटकांना घेऊन जाणारे विमान शाळेवर कोसळले, 12 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

केनियात पर्यटकांना घेऊन जाणारे विमान शाळेवर कोसळून 12 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. निवासी भागात विमान कोसळल्याने दुर्घटनेत काही घरांचे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी 8.30 वाजता डायनी येथून उड्डाण केल्यानंतर किचवा टेम्बोला जात असताना हा अपघात झाला.

केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताची पुष्टी केली आहे. विमान निवासी भागातील एका शाळेवर कोसळले. या अपघातात काही घरे उद्ध्वस्त झाली आणि अनेक लोक जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात कशामुळे घडला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.