
मतदार यादीतील घोळाबाबत निवडणूक आयोगाच्या धोरणाविरोधात 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा मुंबईत काढण्यात येणार आहे. या मोर्चास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या धोरणाविरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईत निघणाऱया सर्वपक्षीय मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. रिपाइंच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन निकाळजे यांनी केले आहे. रिपाइं कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, सचिव अशोक ससाणे, संघटक सचिव पैलास जोगदंड यासंदर्भातील माहिती एका पत्राद्वारे दिली आहे.
 
             
		





































 
     
    





















