
सासू आणि सूनेच्या गोड नात्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून प्रत्येकीला अशी सासू आणि अशी सून मिळावी असेच वाटेल. कोमल नावाची डिजिटल क्रिएटर @candidmaa नावाचे इन्स्टाग्राम चॅनेल चालवते. तिला दोन मुले आहेत. तिच्या प्रत्येक कामात सासूबाईंचा तिला भक्कम पाठिंबा असतो. सासूबाई सुनेच्या पाठीशी नेहमी उभ्या राहतात. सासूबाईंचे आभार मानण्यासाठी सूनबाई त्यांच्यासाठी काहीतरी खास करते. ती सासूला गिफ्टचा बॉक्स देते. गिफ्टचा बॉक्स उघडताच त्यामध्ये आयपह्न असतो. आपल्यासाठी सुनेनं आयपह्न घेतला या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नाही. सासूबाईंची रिअॅक्शन पाहून सूनसुद्धा भारावून जाते. सासू-सुनेच्या गोड व्हिडीओवर नेटीजन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
 
             
		





































 
     
    





















