फोर्ड कंपनीची चेन्नईत 3250 कोटींची गुंतवणूक

अमेरिकेची वाहन कंपनी फोर्डने नवीन जनरेशनचे इंजिन बनवण्यासाठी चेन्नईत 3250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती शुक्रवारी दिली. यासाठी तामीळनाडू सरकारसोबत एक समझोता करण्यात आला असून या करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या आहेत. याआधी कंपनी 2021 मध्ये हिंदुस्थानी बाजारातून गाशा गुंडाळला होता. वर्षाला 2.35 लाख इंजिन बनवले जातील.