
छत्तीसगडच्या दाट जंगलात राहणारे काही आदिवासी मुलांना कार्टून म्हणजे काय हे माहीतच नाही, पण हे चित्र बदलण्याचा प्रयत्न एका सीआरपीएफ जवानाने केला आहे. आपल्या मोबाईलवर जेव्हा या आदिवासी मुलांना पहिल्यांदा कार्टून दाखवले तेव्हा डोळ्यांतील चमक आणि आनंदाचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. छत्तीसगडच्या दाट जंगलातील एका हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा एक जवान आपल्या मोबाईलवरून आदिवासी मुलांना कार्टून दाखवताना दिसतो. एक्सवर @KiloMike2 नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अनेक लहान मुले आश्चर्यचकित नजरेने मोबाईलकडे पाहत हसताना दिसत आहेत.































































