ट्रेंड – माझ्या राजा रं…

हजारो शब्दांनी जो परिणाम साधला जात नाही, तो परिणाम एका चित्राने साधला जातो. तेच चित्र लोकांच्या मनाच्या गाभार्यात रूतून बसते. तोच धागा पकडून रिक्षातील एका प्रवाशाने नखांच्या साहाय्याने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे. आपले आदर्श असणाऱ्या महामानवांना आदरांजली वाहण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात, मग कोणी त्यांना सांगितिक, सांस्कृतिक व पुस्तके वाचून आदरांजली वाहतो. परंतु एका रिक्षातील प्रवाशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटताना डोळ्यांचे पारणे फेडले आहे. नखांच्या सहाय्याने ते चित्र रेखाटण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहुब छबी रेखाटण्यात त्यात त्यांना यश आले.