पाकिस्तानचे नौदलप्रमुख बांगलादेश दौऱ्यावर

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानचे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल नवीद चौधरी हे 8 नोव्हेंबर रोजी बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा हा दौरा चार दिवसांचा असणार आहे. बांगलादेशात सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांचा बांगलादेश दौरा वाढला आहे. गेल्या 11 महिन्यांत पाकिस्तानी सैन्य किंवा सरकारी अधिकारी यांचा हा 7 वा दौरा आहे. याआधी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार, संरक्षण राज्यमंत्री कमाल खान, यांनी बांगलादेशचा दौरा केला आहे.