मुलीचा प्रेम विवाह मान्य नव्हता, पित्याने मुलीच्या सासऱ्याला मारहाण करुन घराला लावली आग

अलिकडे प्रेम विवाह सर्रास करताना दिसतात मात्र आजही प्रेमविवाहाला काही ठिकाणी मान्यता नाही. खूप कमी वेळा दो्न्ही कुटुंबांना ते मान्य़ असते. असेच काहीसे एक प्रकरण समोर आले आहे. जिथे मुलीने प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या वडिलांनी चक्क मुलीच्या धराला आग लावल्याची घटना घडली आहे.

संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. झरासंघम मंडलमधील कक्करवाड गावात एका तरुणाच्या घराला आग लावण्यात आली आहे आणि मुलाच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना मुलीच्या वडिलांच्या द्वेषाने झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुदिराज कृष्ण आणि मोनिका यांनी अलिकडेच प्रेमविवाह केला होता. या लग्नाने मोनिकाचे घरचे नाराज होते तर तिच्या वडिलाना ते लग्न मान्य नव्हते. याच गोष्टीमुळे त्यांच्यात रोष पसरला होता आणि तिच्या वडिलांनी सूड घ्यायचे ठरवले.

मोनिकाच्या वडिलांनी कृष्णच्या वडिलांवर हल्ला केला आणि रागाच्या भरात त्यांचे घर जाळले, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.कृष्णच्या कुटुंबाने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु आहे. 2018 साली केलेल्या एका सर्व्हेनुसार 93 टक्के विवाहित हिंदूंनी सांगितले की, त्यांचे लग्न अरेंज मॅरेज होते तर 3 टक्के लोकांतचे लव्ह मॅरेज होते.