
अमेरिकेतील सरकारी शटडाऊनला आता 35 दिवस पूर्ण झाले आहेत. या शटडाऊनचा थेट परिणाम नोकऱ्यांवर होत आहे. हवाई प्रवास ठप्प झाला असून एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि टीसीएस कर्मचारी विनावेतन काम करत आहेत, तर काही कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंद केले आहे. त्यामुळे अमेरिकेतील शिकागो, डेनवर, ह्युस्टन, नेवार्क यांसारख्या प्रमुख हवाई विमानतळांवरील उड्डाणांना उशीर होत आहे. कंट्रोलर आता अतिरिक्त काम किंवा दुसरी नोकरी शोधण्यासाठी मजबूर झाले आहेत. कर्मचारी कामाला दांडी मारत आहेत.






























































