फिलिपिन्समध्ये चक्रीवादळामुळे लाखोंच्या कार कचऱ्यात!

फिलिपिन्समध्ये आलेल्या चक्रीवादळ टिनोने प्रचंड नुकसान केले आहे. 220 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने समुद्रकिनारी पाच फुटांपर्यंत लाटा उसळल्या. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे रस्त्यावर उभी असलेली वाहने वाहून गेली. काही ठिकाणी वाहून आलेल्या कार एकमेकांवर अशा फेकल्या गेल्या. सेबू शहर, समर, दिनागाट द्वीप, लेयते आणि जवळपासच्या परिसरास या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. पोलीस आणि डॉक्टरांच्या पथकांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.