
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातल्या 29 महानगर पालिकांच्या संदर्भात आज रात्री उशिरा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील या महानगर पालिकांची अंतिम मतदार यादी 10 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार होती. पण आता 6 डिसेंबरला राज्यातल्या 29 महानगर पालिकांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 या तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 29 महानगरपालिकांच्या मतदार पेंद्राची यादी 8 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून 12 डिसेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर केली जाईल.






























































