
आयफोन युजर्ससाठी नवीन अपडेटेड सिरी व्हर्जन पुढील वर्षात म्हणजेच 2026 मध्ये लाँच केले जाईल, अशी माहिती ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 2024 मध्ये आयओएस 18 अपडेटसोबत सिरीचा नवीन लूक आणि काम करण्याची पद्धत समोर येईल असे वाटत होते, परंतु आता 2026 मध्ये आयफोन सिरीचे नवीन व्हर्जन येणार आहे. आयफोनला एका मजबूत एआयची गरज आहे. यावर 2026 मध्ये ऍपलचा मुख्य फोकस असणार आहे.
























































