
सर्वात आधी वाहत्या पाण्याने डोळे हळुवारपणे धुवा. जसे की, डोळे उघडे ठेवून त्यावर पाणी सोडा. डोळ्यात कचरा गेल्यानंतर डोळ्यातून पाणी येत असल्यास एक स्वच्छ, उबदार आणि ओला कपडा डोळ्यावर काही मिनिटांसाठी ठेवा. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होईल.
डोळ्यात कचरा गेला म्हणून लगेच डोळे चोळत बसू नका. यामुळे डोळ्याला दुखापत होऊ शकते. तसेच डोळ्यातील कचरा आणखी आत जाण्याची भीती असते. जर घरात तुमच्याकडे डोळे स्वच्छ करणारे औषध असेल तर त्याचे दोन थेंब डोळ्यात टाकू शकता, परंतु हे औषध डॉक्टरांनी दिलेले असावे. जर डोळ्यातून कचरा काढणे शक्य होत नसेल किंवा डोळ्याला जास्त त्रास होत असेल तर ताबडतोब डोळ्यांच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटा.
























































