
केस गळणे, डोक्यातील कोंडा ही आजकाल खूप सामान्य समस्या आहे. बहुसंख्य जण केस उत्तम घनदाट राहण्यासाठी, विविध शॅम्पू, तेल किंवा सीरम वापरतात. परंतु केसांची खरी ताकद त्यांना आतून मिळणाऱ्या पोषणावर अवलंबून असते. केस घनदाट होण्यासाठी काही काढे किंवा ज्यूसही खूप महत्त्वाचे ठरतात. असाच एक ज्यूस आपण केसांच्या निरोगी आरोग्यासाठी करणार आहोत. हा ज्यूस अगदी साधा सोपा असून, घरच्या घरी आरामात करता येईल असाच आहे. या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, सी, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे अनेक पोषक घटक असतात. जे केसांना मुळांपासून पोषण देतात. हा रस पिल्याने केस गळणे कमी होऊ शकते आणि नवीन केसांची वाढ होण्यास चालना मिळू शकते.
केसांच्या वाढीचा रस बनवण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत?
आवळा – १
काकडी – १/२ काकडी
गाजर – १ गाजर
धणे किंवा पुदिन्याची पाने – १/२ कप
पाणी – १ ग्लास
लिंबू किंवा मध – १ चमचा
स्वयंपाक करताना भाजी किंवा आमटीमध्ये मीठ केव्हा घालावे, जाणून घ्या
केसांच्या वाढीसाठी रस कसा बनवायचा?
केसांच्या वाढीसाठी रस बनवण्यासाठी, प्रथम सर्व साहित्य चांगले धुवा.
आवळा, काकडी आणि गाजर यांचे लहान तुकडे करा.
पुढे, गाजर, काकडी, आवळा आणि धणे/पुदिना मिक्सर जारमध्ये ठेवा. १ ग्लास पाणी घाला आणि चांगले मिसळा.
एक ग्लासमध्ये रस पूर्णपणे गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस किंवा मध घाला. हा ज्यूस लगेच प्यावा.





























































