राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एक मोठे प्रकरण समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 1 लाखांचे भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्यूटी लावण्यात आली असून सरकारी नियम वाकवून ही खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याच संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली.
























































