पार्थ पवार यांच्या महाभूखंड घोटाळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना याच्याशी माझा दुरान्वयेही संबंध नाही असे म्हटले आहे. आजपर्यंत कधीही माझ्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत. मी कधीही अधिकाऱ्यांना फोन करून काही आदेश दिलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची जरूर चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. त्यातील सत्यता पडताळून पाहणे हे सरकारचे कामच आहे, असे अजित पवार म्हणाले


























































