
नोकरी बदलल्यानंतर पीएफसाठी आता फॉर्म भरण्याची किंवा ईपीएफ ट्रान्सफर होण्याची वाट पाहावी लागणार नाही. ईपीएफओने आता एक नवीन ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम लागू केली आहे. या नव्या सिस्टममुळे आता कर्मचाऱ्यांना नोकरी बदलल्यानंतर पीएफ बॅलन्स नव्या कंपनीच्या पीएफ खात्यात आपोआप ट्रान्सफर होईल. याआधी कर्मचाऱ्यांना नोकरी बदलल्यानंतर फॉर्म 13 भरावा लागत होता. फॉर्म भरल्यानंतर कंपनीकडून पडताळणी करून घ्यावी लागत होती. यासाठी किमान एक ते दोन महिने लागत होते. परंतु आता अवघ्या एक ते दोन दिवसात पीएफ ट्रान्सफर होईल.
नव्या सिस्टमनुसार, कर्मचारी नवीन नोकरीत सामील होईल तेव्हा नवीन नियोक्ता यूएएनला लिंक करेल. ईपीएफओ पोर्टलवर आधार आणि केवायसीद्वारे ऑटो व्हेरिफिकेशन होईल. जुनी पीएफ शिल्लक थेट नवीन खात्यात हस्तांतरित केली जाईल. यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. हे हस्तांतरण अवघ्या 3 ते 5 दिवसात होईल. यासाठी यूएएन केवळ आधारशी लिंक केलेला असावा, हीच एक अट आहे.
या नव्या सिस्टमचा फायदा 10 कोटींहून अधिक लोकांना होईल, असे ईपीएफओचे म्हणणे आहे. स्वयंचलित हस्तांतरणामुळे कागदविरहित आणि जलद सेवा मिळेल. यूएएनला आधारशी जोडल्याने फसवणूकसुद्धा टाळता येईल. 2025 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी पूर्ण करू, असेही या अधिकाऱ्याने म्हटले. कर्मचारी त्यांचे पीएफ बॅलन्स, क्लेम स्टेटस आणि केवायसी अपडेट्स ऑनलाइन तपासू शकतात. जर यूएएन जुना असेल तर तो अपडेट करू शकता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.


























































