
मुंबईकरांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातही अनेक समस्या आहेत. तेथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने ‘जनता दरबार’चा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार कांदिवली पश्चिमेकडील चारकोप विधानसभा मतदारसंघात रविवारी शिवसेनेचा ‘जनता दरबार’ पार पडला. या वेळी शिवसेना आमदारांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवडय़ात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.
चारकोप विधानसभा मतदारसंघातील (विभाग क्र. 2) शिवसेना शाखा क्र. 20 आणि 21च्या वतीने ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू आणि आमदार अनंत (बाळा) नर यांनी चारकोप परिसरातील नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱयांना पह्न कॉल करून तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. तसेच यासंदर्भात पुढील आठवडय़ात अधिकाऱयांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत. शिवसेनेचे आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघांत मुंबईतील इतर आमदार जाणार आहेत आणि ‘जनता दरबार’च्या माध्यमातून तेथील जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे सुनील प्रभू यांनी सांगितले. या वेळी ‘जनता दरबार’चे आयोजक, विभागप्रमुख संतोष राणे, महिला विभाग संघटक मनाली चोकीदार, शुभदा गुडेकर, गीता भंडारी, अभिषेक शिर्पे, विधानसभा प्रमुख राजू खान, पैलास कणसे, संतोष धनावडे, सुषमा कदम, विधानसभा संघटक राजेंद्र निकम, सत्यवान वाणी, सुवर्णा प्रसादे, सविता देसाई, उपविभाग प्रमुख शाम मोरे, अनंत नागम, आशीष पाटील आदी पदाधिकारी तसेच संयोजक शाखाप्रमुख विजय मालुसरे, रवींद्र मर्ये उपस्थित होते.



























































