अंडी अधिक काळ टिकावी म्हणून काय करायला हवं?

अंडी ही प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. हिवाळ्याच्या दिवसात अंडी खाण्याचे प्रमाण वाढते. परंतु अंडी योग्यरित्या साठवली गेली नाही तर ती लवकर खराब होतात. उष्ण किंवा दमट हवामानात अंड्यांचा ताजेपणा राखणे विशेष महत्वाचे आहे. अंडी नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला हवी. रेफ्रिजरेटरमध्ये अंडी ठेवताना कायम काळजी घ्यायला हवी. रिफ्रेजरेटरमधील दारावर अंडी कधीही ठेवू नयते. कारण तिथल्या तापमानाता वारंवार चढ-उतार होत असतात. म्हणूनच अंडी ही कायम फ्रीजच्या मधल्या खणांमध्ये ठेवणे उत्तम.

उत्तम आरोग्यासाठी मासांहरींनी आहारात हे समाविष्ट करायलाच हवे, वाचा

अंडी साठवण्यापूर्वी काय लक्षात ठेवायला हवे?
अंडी अधिक काळ टिकावी म्हणून, कधीही धुवू नका. अंड्यांच्या कवचांमध्ये एक संरक्षक थर असतो जो त्यांना बॅक्टेरियापासून वाचवतो. धुण्याने हा थर निघून जातो आणि अंडी लवकर खराब होतात. अंडी घाणेरडी असेल तर ती वापरण्यापूर्वी ती थोड्या ओल्या कापडाने स्वच्छ करा.

अंड्यांचा ताजेपणा कसा तपासायचा?
एका वाटीत पाणी घ्यावे. त्यात अंडी ठेवावी, अंडी तळाशी बुडाली तर ती ताजी आहेत. परंतु जर ती पाण्यावर तरंगली तर ती खराब आहेत.

हिवाळ्यात केसातील कोंडा कमी करण्यासाठी हे नैसर्गिक डिटॉक्स पेय दररोज प्यायलाच हवे

अंडी किती काळ टिकतात?
रेफ्रिजरेटरमध्ये योग्यरित्या साठवल्यास, अंडी सुमारे 3 ते 4 आठवडे टिकतात. अंडी नेहमी स्थिर तापमान असलेल्या ठिकाणी ठेवा आणि वारंवार काढणे टाळा.

उकडलेले अंडे किती काळ टिकते?
उकडलेले अंडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर ते १ आठवड्यापर्यंत खाण्यायोग्य राहते.

दररोज एक चमचा तूप खा; जेवणाची चव वाढेल आणि आरोग्यासाठी देखील उत्तम

अंड्याची मुदत संपण्यास किती वेळ लागतो?
खरेदी केल्यानंतर अंडी साधारणपणे २५ ते ३० दिवस रेफ्रिजरेटरमध्ये राहतात. खोलीच्या तपमानावर साठवल्यास, ती ७ ते १० दिवसांत खराब होऊ शकतात. अंडी किती काळ टिकेल याचा अंदाज घेण्यासाठी पॅकेजवरील पॅकेजिंग तारीख नेहमी तपासा.

अंडी खराब झाली आहे की नाही हे कसे ओळखायचे?
अंड्याला विचित्र किंवा कुजलेला वास येऊ लागला तर ते अंडे ताबडतोब टाकून द्या.

या सोप्या टिप्सचा अवलंब करून, तुम्ही अंडी अनेक दिवस सुरक्षित आणि ताजी ठेवू शकता.