योगी आदित्यनाथ म्हणाले दुसरा जीना जन्माला येऊ देऊ नका!

‘जात, धर्म आणि भाषेच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना ओळखून त्यांना विरोध केला पाहिजे. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणजे नवा जिना निर्माण करण्याचा कट आहे. हिंदुस्थानात दुसरा मोहम्मद अली जीना व मोहम्मद अली जौहर जन्माला येऊ नये यासाठी जागरूक राहा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

‘देशात राहणाऱ्या प्रत्येकाने या देशाशी प्रामाणिक राहिलेच पाहिजे. वंदे मातरम् म्हणण्यास नकार देणारे देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा अपमान करत आहेत. अशा लोकांचे फुटिरतावादी विचार मूळ धरण्याआधीच उखडून फेकले पाहिजेत आणि ते सर्वांनी केले पाहिजे, असे ते म्हणाले.