
मुंबई वैद्य सभा आयुर्वेदिक नामांकित चिकित्सकांना सन्मानित करण्यासाठी धन्वंतरी पुरस्कार प्रदान करते. यंदाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. आल्हाद परांजपे आणि डॉ. विनोद मेहता यांना तर जीवनगौरव डॉ. सुभाष जोशी यांना प्रदान करण्यात आला.
विलेपार्ले येथे पार पडलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. ओमप्रकाश दुबे आणि धूतपापेश्वर लिमिटेडचे एमडी रणजीत पुराणिक होते. मुंबईतील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांमधील अंतिम वर्ष बीएएमएसमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि अकरा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई वैद्य सभेचे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर शर्मा यांनी आपल्या भाषणात आयुर्वेदाचे सिद्धांत, रुग्ण प्रकृती आणि दोषांवर आधारित रुग्णांवर चिकित्सा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र शर्मा यांनी गेल्या काही वर्षांत संस्थेने केलेल्या विविध कामगिरीवर प्रकाश टाकला.




























































