माता रमाबाई आंबेडकर, कामराज नगरमधील रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर द्या!

घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील रहिवाशांना पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत 500 चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्ष संघटक विलास रुपवते यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरचा पुनर्विकास एमएमआरडीए आणि एसआरए संयुक्तरीत्या करणार आहेत. या ठिकाणी मध्यमवर्गीय, कामगार वर्ग तसेच हातावर पोट भरणारे नागरिक राहतात. या रहिवाशांना पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 300 चौरस फुटांचे घर देण्यात येणार आहे. जर सरकारला खरेच कष्टकरी कामगारांविषयी प्रेम असेल तर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी विलास रुपवते यांनी केली आहे.