
स्फोटाचे कारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमध्ये बोलताना दिला. ‘दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने मन व्यथित झाले आहे. संपूर्ण देश पीडितांच्या पाठीशी आहे. काल रात्रभर मी विविध तपास यंत्रणांचे अधिकारी व महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो. आमच्या तपास यंत्रणा या कारस्थानाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे मोदी म्हणाले.
हा हल्ला होता का, सरकारने सांगावे – काँग्रेस
दिल्लीतील स्पह्टांबद्दल अद्यापही संदिग्धता आहे. हा अपघात होता की हल्ला हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मीडियादेखील सरकारला प्रश्न विचारत नाही. संकटात संधी कशी शोधायची? ध्रुवीकरण कसे घडवून आणायचे यावरच लक्ष आहे, असा संताप काँग्रेस प्रवत्ते पवन खेरा यांनी व्यक्त केला.
सलमान–देवेंदर–तारीक आणि उमर
स्फोटात वापरलेली कार एकापाठोपाठ एक तीन जणांना विकण्यात आली होती. कार ज्याच्या नावे रजिस्टर होती, त्या सलमानला सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्याने ही कार देवेंदरला विकल्याचे सांगितले. देवेंदरने ती कार तारीकला विकली. शेवट ती उमरकडे आली होती.



























































