दिल्लीत स्फोट झाल्याची अफवा, बसचा टायर फुटल्याने लोकांमध्ये दहशत

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात रेडिसन हॉटेलजवळ स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. घटनेची बातमी मिळताच पोलrस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. कॉल करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्याने सांगितले की गुरुग्रामकडे जात असताना त्याला एक मोठा आवाज ऐकू आला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर असे काहीही आढळले नाही.

स्थानिक लोकांकडून चौकशीदरम्यान एका गार्डने सांगितले की, धौला कुआंकडे जाणाऱ्या एका DTC बसचा मागचा टायर फुटला होता, ज्यामुळे तो मोठा आवाज झाला. डीसीपी साऊथ वेस्ट यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे आणि काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या आवाजाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिपालपूरमधील रेडिसनजवळ जाऊन तपास सुरू केला. तपास पथकाला त्या ठिकाणी कोणताही स्फोट किंवा अन्य घटना आढळली नाही.

पोलिसांनी आवाजाचा स्रोत शोधण्यासाठी स्थानिक लोकांकडून विचारपूस केली. एका सुरक्षा रक्षकाने पोलिसांना सांगितले की, आवाज प्रत्यक्षात धौला कुआंकडे जात असलेल्या DTC बसचा टायर फुटल्यामुळे आला होता.