
पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील चंद्रकोणा परिसरात एक हृदयस्पर्शी घटना घडली. मौला गावातील चहाची टपरी असलेल्या बच्चू चौधरी यांनी आपल्या लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार वर्षांपासून 10 रुपयांची नाणी जमा केली. ते स्कूटी खरेदी करण्यासाठी नाण्यांनी भरलेला ड्रम घेऊन शोरूममध्ये पोहोचले तेव्हा सारेच चकीत झाले.
बच्चू चौधरी यांच्या मुलीने स्कूटीची इच्छा व्यक्त केली. आर्थिक अडचणींमुळे ते तेव्हा आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करू शकले नाहीत. परंतु त्यांनी एक दिवस त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा निर्धार केला होता. त्यांनी त्यांच्या चहाच्या टपरीवर एक रिकामा ड्रम ठेवला आणि दररोज त्यात 10 रुपयांची नाणी टाकली. नाणी मोजायला दोन-अडीच तास लागले. ड्रममध्ये अंदाजे 69,000 रुपयांची नाणी होती आणि उर्वरित नोटा होता. असे एकूण एक लाख 10 हजार रुपये जमा झालेले होते.

























































