
मध्य रेल्वे मार्गावर गेल्या सात महिन्यांत तब्बल 24 लाख प्रवाशांनी फुकट प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये मुंबई विभागातील संख्या सर्वाधिक आहे. त्या विनातिकीट प्रवाशांकडून 141 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत दंडवसुलीची रक्कम 14 टक्क्यांनी वाढली आहे.
मध्य रेल्वेने यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत हाती घेतलेल्या मोहिमांमध्ये 23 लाख 76 हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघडकीस आले. गेल्या वर्षी याच कालावधीत 22 लाख प्रवाशांवर कारवाई केली होती. गेल्या वर्षी या अवधीतील दंडाची रक्कम 124 कोटी 36 लाख रुपये इतकी होती. ऑक्टोबर महिन्यात 3.71 लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली.



























































