
अंतराळात रॉकेट पाठवणारी कंपनी ब्लू ओरिजिनने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कंपनीने न्यू ग्लेन नावाच्या मोठय़ा रॉकेटला यशस्वीरित्या अंतराळात पाठवले आहे.
ज्यात नासाचे मंगळ ग्रहावर जाणाऱ्या ब्लू आणि गोल्ड या दोन स्पेसक्राफ्टचा समावेश होता. हे रॉकेट नासाच्या ‘एस्केपेड मिशन’साठी दोन सॅटेलाइट्स घेऊन गेले आहे.
हे दोन्ही सॅटेलाइट जवळपास 11 महिने मंगळ ग्रहावरील हवामानाचा अभ्यास करतील. भविष्यात मानव मिशनच्या योजना बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रॉकेटचा खालचा भाग ज्याला बूस्टर म्हटले जाते. उड्डाण केल्यानंतर यशस्वीपणे परत आले. या बूस्टरला ब्लू ओरिजिन कंपनीने यशस्वीपणे जमिनीवर उतरवले आहे.
याआधी केवळ इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सही मोठे रॉकेट पाठवण्याचे काम करत होती. ब्लू ओरिजिन आता रॉकेटच्या महागडय़ा भागाचा पुन्हा वापर करणारी दुसरी कंपनी बनली आहे.



























































