
गाडी चालवताना कधी कधी गाडीचा ब्रेक फेल होतो. अशा वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली तर काय कराल.
गाडीचा वेग कमी करण्यासाठी हळूहळू गिअर्स बदला. क्लच दाबून गिअर डाऊनशिफ्ट करा. ऑटोमॅटिक कार असेल तर पॅडल शिफ्टर किंवा गिअर सिलेक्टरने कमी गीअरमध्ये जा.
ब्रेक पेडल वारंवार दाबून आणि सोडून ब्रेकिंगची शक्ती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा वेळी तुम्ही हँडब्रेकचाही वापर करू शकता.
गाडीचा वेग कमी करण्यासाठी इंजिन ब्रेकिंगचा वापर करा. इंजिनला गतिमान ठेवण्यासाठी गाडी न्यूट्रलमध्ये टाकू नका. कारण यामुळे ब्रेकिंगची शक्ती कमी होऊ शकते.
जेव्हा गाडीचा वेग कमी होऊ लागतो, तेव्हा शक्य असल्यास गाडी गवताच्या, वाळूच्या किंवा मातीच्या भागावर चालवण्याचा प्रयत्न करा. गाडी स्लो होऊन हळूहळू थांबेल.


























































