सहा महिन्यांपूर्वी अपहरण झालेली मुलगी काशी अनाथालयात सापडली, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी शोधून काढली

सोलापूर येथे राहणारे एक कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आले असता त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. त्या वेळी कसून शोध घेऊनही त्या मुलीचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर एमआरए व आझाद मैदान पोलिसांच्या पथकाने अचूक माग काढला असता ती मुलगी काशी अनाथालयात असल्याचे हुडकून काढले.

चार वर्षांच्या त्या मुलीला त्यांच्या पालकांच्या नकळत पळवून नेण्यात आले होते. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांची विविध पथके बनवून तिचा शोध सुरू केला होता. आरोपी मुलीला घेऊन वाराणसी येथे जाणाऱया एक्स्प्रेसमधून गेल्याचे निष्पन्न होताच पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी जाऊन शोधमोहीम राबवली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र आता मुलगी मिळाल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

  • एमआरए व आझाद मैदान पोलिसांच्या पथकाने पुन्हा तेथे जाऊन शोध घेतला असता एक चार वर्षांची मुलगी काशी अनाथालयात असून ती मराठी बोलत असल्याची माहिती तेथील पत्रकाराकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ते अनाथालय गाठून मुलीला पुन्हा मुंबईत आणले. अशा प्रकारे सहा महिन्यांपासून अपहरण झालेल्या मुलीला पुन्हा तिच्या पालकांच्या कुशीत आणून देण्यात पोलिसांना यश आले.