
मतदार यादीतील घोळ, मतचोरी यावरून देशभरात वादळ उठले असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निवडणुकीत पैसा खर्च करावाच लागतो, पण लोकं पैसे घेतात आणि त्यांना वाटेल तिथेच मत देतात, असे वक्तव्य पटेल यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटाच्या एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले. निवडणुकीमध्ये पैसे खर्च करावे लागतात, ते आवश्यक असते. पण फक्त पैशांच्या आधारावर पुणी जिंकून येत नाही, समझनेवालोको इशारा काफी है, असे पटेल म्हणाले.
अजित पवार गट सक्षम आहे, आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, इतरांना आपली चिंता करावी लागेल, असे कार्यकर्त्यांना सांगतानाच प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय जनता पक्षालाही अनुल्लेखाने इशारा दिला. कुणीही स्वतःला बाहुबली समजू नये, मागच्या काळात असे अनेक बाहुली आम्ही निवडून दिले आहेत, असे पटेल म्हणाले.































































