माहीम येथे सापडले मृत अर्भक

माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाजवळील चौपाटी येथे मृत अर्भक आढळून आले. त्या मृत अर्भकाच्या शरीरावर जखमा आहेत. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मीरा कासटे या माहीम पोलीस ठाण्यात काम करतात. शुक्रवारी त्या रात्रपाळीला होत्या. शनिवारी सकाळी त्यांना नियंत्रण कक्षातून माहिती देण्यात आली. माहीम हिंदुजा चौपाटी येथे एक अर्भक बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्या अर्भकाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ते अर्भक तपासून मृत घोषित केले. अर्भकाच्या हातावर आणि दंडावर खोल जखमा होत्या. तसेच अर्भकाचा डावा डोळादेखील नव्हता. डोळय़ाच्या आजूबाजूला जखमा होत्या. त्या अर्भकाला समुद्राच्या पाण्यात फेकून देण्यात आले.