
मराठवाडा येथील आसमानी संकटामुळे आतोनात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी सेवानिवृत्त शिधावाटप कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधव आज परिस्थितीशी झगडत आहेत. त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे सामाजिक भान जपत सेवानिवृत्त झालेल्या शिधावाटप कर्मचाऱ्यांनी दोन लाख रुपये जमा करून त्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ केला आहे.




























































