
स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातून शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी येणाऱया शिवसैनिकांसाठी अल्पोपहार व पाणी वाटप उपक्रमाचे आयोजन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या वेळी शिवसेना नेते – खासदार व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई, विभागप्रमुख – आमदार महेश सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी कक्षाचे उपाध्यक्ष राजू पाटील, सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत, राजेश कुचिक, देविदास माडये, वनिता पटेल, बबन सकपाळ, सदानंद घोसाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने विद्यार्थी कल्याण भवन येथे व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यसनाचे संचालक डॉ. सुनील पाटील, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी ज्येष्ठ प्राध्यापक नितीन केणी, एनएमएमआयएसचे प्राध्यापक – व्यंगचित्रकार नितीन निगडे, व्यंगचित्रकार प्रशांत पाटील, व्यंगचित्रकार केसर चोपडे, विद्यार्थी विकास जिल्हा समन्वयक प्रा. अलोक हर्डीकर तसेच युवासेना माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते.

स्थानीय लोकाधिकार समिती आणि आरसीएफ कर्मचारी सेनेच्या वतीने आरसीएफ लोकाधिकार समितीच्या कार्यालयात पुष्पहार अर्पण करून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आरसीएफ कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दत्तात्रय परब, लोकाधिकार समितीचे सरचिटणीस अल्हाद महाजन, एससी एसटी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश निकाळजे, उपाध्यक्ष जे. पी. सिंग, युनिट सेक्रेटरी नीलेश गावकर उपस्थित होते.

बेळगाव सीमाभाग शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी आणि जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह दिलिप बैलूरकर, मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, शुभम शेळके, मनोज पावशे, महेश टंकसाळी, राजकुमार बोकडे, रमेश माळवी, विनायक हुलजी, पिराजी शिंदे, विनायक बेळगावकर, शिवाजी जाधव, रवी साळुंखे, राजू कणेरी, मनोहर हुंदरे, वैभव कामत, विजय सावंत, राहुल कुडे, प्रकाश भोसले, प्रथमेश शिरोळकर, धनजंय पाटील उपस्थित होते.

शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधकडकर यांनी शिकसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याकेळी समन्कयक यशोदा कोटियन, हरिभाऊ गायकर, गणेश भायदे, श्रीराम पुजारी, रमेश भोसले, काळूराम रोकडे, किजय कदम, शंकर धुमाळ, रकी साटम संजय साकंत, नथुराम लाडे, प्रशांत प्रभुलकर, ज्ञानोबा बादल आदी उपस्थित होते.

प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळेत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑस्ट्रेलियास्थित सारा हॉलिडेज ट्रव्हल एजन्सीच्या रचना चित्रे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत लहान गटात ध्रुवी शिरगावकर हिने तर मोठय़ा गटात ओमिका सुर्वे हिने प्रथम क्रमांक पटकावला. बालचित्रकारांची कल्पकता, रंगसंगती व विषयाची मांडणी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती.

शक्तिस्थळावर दर्शनासाठी येणाऱया शिवसैनिकांसाठी शिव आरोग्य सेनेतर्फे प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार दोन ऍम्ब्युलन्स व प्रथमोपचार केंद्र तसेच चार डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती. या वेळी शिव आरोग्य सेनेचे राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ, मुंबई सचिव ज्योती भोसले, मुंबई सहसमन्वयक प्रकाश वाणी, डॉ. रेखा भुईंबर, अलीफिया रिझवी, डॉ. प्रशांत भुईंबर, एकनाथ अहिरे, डॉ. संतोष भानुशाली, विकास भोसले, गिरीश विचारे, अविनाश पाटील, रवी पवार, आकाश रघुवंशी आदी उपस्थित होते.

शिवसेना मालाड पश्चिम विधानसभा आणि शिवस्नेही प्रज्ञा प्रबोधन संस्थेच्यावतीने शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस विभाग समन्वयक अशोक पटेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विजय मांडाळकर, प्रभाकर देसाई, विलास दळवी, मुख्याध्यापिका हर्षदा राऊत, रोहिणी सावे, नीलम माने, मनीषा घेवडे आदी उपस्थित होते.






























































