लोक AC कोचचे तिकीट काढतात आणि चपला चोरतात! प्रवाशाने सांगितला रेल्वेतील भयंकर अनुभव

लांब पल्ल्याचा प्रवासासाठी खासगी वाहनापेक्षा रेल्वेने प्रवास करणे अनेकजण पसंत करतात. मात्र, रेल्वेच्या रेग्युलर डब्ब्यातून प्रवास करणे जरा कठीण असते. पाकीट, कपड्यांच्या बॅगा, किंवा किमती वस्तू चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यासाठी लोक एसी कोच बुक करून कोणतही टेन्शन न घेता प्रवास आगदी आनंदाने करतात. मात्र, जर 2 AC कोचने प्रवास करूनही तुमच्या वस्तू चोरी झाल्या तर… असाच एक अनुभव एका प्रवाशाला आलाय. या प्रवाशाने Reddit या सोशल मीडिया अॅपवर त्याचा हा अनुभव शेअर केला आहे.

पाटणा ते बंगळुरू असा प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने रेल्वे प्रवासातील एक अनुभव शेअर केलाय. मी 2 AC कोचने पाटलीपुत्र ते बंगळुरू असा प्रवास करत होतो. आणि पहाटे जेव्हा मी झोपून उठलो तेव्हा माझ्या स्लीपर्स हरवल्या होत्या. हे कसं शक्य आहे? म्हणजे लोक 2 AC कोचने प्रवास करताता आणि चप्पल चोरतात. हे खूप विचित्र आहे, असे त्याने म्हटले आहे.

People can afford 2AC but will still steal a slipper. Indian Railways experience
byu/SimpleDetective10 inindianrailways

तो पुढे म्हणाला की, माझी चप्पल नक्की चोरीला गेली की कोणी दुसरा व्यक्ती ती चुकून घालून गेलाय? याबाबत मला कल्पना नाही. पण लोक 2 AC ची तिकिट विकत घेऊन 2 हजारांची चप्पल चोरतात. आता मला संपूर्ण प्रवास विनाचप्पल करावा लागणार आहे, असे त्याने म्हटले.

या प्रवाशाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. महागड्या कोचने प्रवास करायचा आणि लोकांच्या चपला चोरायच्या… हे तर हायप्रोफाईल चोर, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. इतर काही युजरने त्यांचे स्वत: अनुभवही शेअर केले आहेत.