हिंदुस्थानात जन्मलेल्या मादी चित्ताने दिला पाच बछड्यांना जन्म

हिंदुस्थानात जन्माला आलेल्या मुखी या मादी चित्ताने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशमधील कुनो अभयारण्यात मुखीने बाळांना जन्म दिला.

मुखी ही स्वत: 33 महिन्यांची असून ती हिंदुस्थानात जन्माला आलेली पहिली मादी चित्ता आहे. प्रोजक्ट चिता अंतर्गत 2022 साली नामिबिया येथून आठ चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आलेले.