पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेलात तर…; नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांना धमकी

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीक झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण १० डिसेंबर रोजी ओस्लो सिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात केले जाणार आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्याने मारिया यांनी आनंद व्यक्त केला आहे. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी नॉर्वेला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, व्हेनेझुएलाच्या अॅटर्नी जनरलने इशारा दिला आहे की, अनेक गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणाऱ्या मचाडो यांनी देश सोडल्यास त्यांना फरार घोषित केले जाईल. नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याला सरकारनेच धमकी दिल्याने याची जगभरात चर्चा होत आहे.

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना १० डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी नॉर्वेला जायचे होते. मात्र, व्हेनेझुएलाच्या मादुरो सरकार त्यांना पुरस्कार स्वीकारण्यापासून रोखत आहे. मचाडे मादुरो सरकारविरुद्ध लढत आहे आणि देशात लपून त्या त्यांची लढाई लढत आहे. मचाडो व्हेनेझुएलामध्ये लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी लढत आहे. सरकारने तिच्यावर दहशतवादाशी संबंधित अनेक गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत. ५८ वर्षांच्या मचाडो यांनी सांगितले आहे की, त्या व्हेनेझुएलामध्ये लपून राहत आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी १० डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभासाठी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

व्हेनेझुएलाचे अॅटर्नी जनरल तारेक विल्यम साब यांनी इशारा दिला की, माचाडोवर अनेक गुन्हेगारी आरोप आहेत आणि त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेल्या तर त्यांना फरार घोषित केले जाईल. त्यांच्यावर अनेक गुन्हेगारी आरोप आहेत. म्हणून त्यांनी व्हेनेझुएला सोडले तर त्यांना फरार मानले जाईल. त्यांच्यावर षडयंत्र रचणे, द्वेषाला चिथावणी देणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणे यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच व्हेनेझुएलाचा शत्रू देश असणाऱ्या अमेरिकेला पाठिंबा दिल्याबद्दल मचाडोची देखील चौकशी सुरू आहे. मचाडो कॅरिबियन समुद्राभोवती अमेरिकन लष्करी दलांच्या तैनातीला समर्थन देतात आणि यासाठी त्यांची चौकशी सुरू आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरिबियन समुद्रात जगातील सर्वात मोठे विमानवाहू जहाज, युद्धनौका आणि लढाऊ विमाने पाठवली आहेत. अमेरिकेचा दावा आहे की ही व्हेनेझुएलाच्या सरकारविरुद्ध अँटी ड्रग्ज मोहीम आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सांगितले की, ट्रम्प यांचे हे पाऊल त्यांचे डावे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाला अमेरिकेने निर्बंधांना तोंड द्यावे लागत आहे. तेलाने समृद्ध असलेल्या या दक्षिण अमेरिकन देशाला २०१५ पासून अमेरिकेने निर्बंधांना तोंड द्यावे लागत आहे. २०१७ मध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी जाहीरपणे व्हेनेझुएलावर लष्करी हल्ल्याचे संकेत दिले होते. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते व्हेनेझुएलाच्या बाबतीत आणखी आक्रमक झाले आहेत. आता मादुरो सरकारने मचाडो यांना दिलेल्या धमकीची जगभरात चर्चा होत आहे.