राजापूरात नगरसेवकपदासाठी 51 आणि नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात

राजापूर नगर परिषद निवडणूकीत शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठीच्या एका उमेदवाराने आणि नगरसेवक पदासाठी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.

नगराध्यक्षपदाच्या रिंगणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या शितल पटेल यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता महाविकास आघाडीच्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, महायुतीच्या श्रृती ताम्हणकर आणि अपक्ष ज्योती खटावकर अशी तिरंगी लढत होणार आहे. तर नगरसेवकपदासाठी वैध ठरलेले सात उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले असून आता दहा प्रभागातील 20 जागांसाठी तब्बल 51 उमेदवार रिंगणात राहीले आहेत. नगरसेवकपदाच्या निवडणूकीसाठी शाहबाज खलिफे यांनी प्रभाग-1 (ब), सोनल केळकर यांनी प्रभाग-2 (ब), आदीत्य बाकाळकर, संजय पवार, सुशांत पवार यांनी प्रभाग-4 (ब), आदील ठाकूर यांनी प्रभाग-7 (ब), माजी नगराध्यक्ष कल्याणी रहाटे यांनी प्रभाग-10 (ब) अशा सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता नगरसेवकपदाच्या वीस जागांसाठी होत असलेल्या लढतीसाठी तब्बल 51 उमेदवार रिंगणामध्ये आहेत.