
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य, त्यांची पत्रे आणि अन्य कागदपत्रे असा संपूर्ण दस्तावेज आता क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जवाहरलाल नेहरू मेमोरिअल फंडने (जेएनएमएफ) पंडित नेहरू यांच्याशी संबंधित 35 हजार कागदपत्रे आणि 3 हजार छायाचित्रे एकत्र करून मोठा ऑनलाईन संग्रह (अर्काइव्ह) उपलब्ध करून दिला आहे.
नेहरू अका&इव्ह डॉट इन या वेबसाईटवर 1920 ते 1960 च्या दशकापर्यंतचा इतिहास संग्रहित करण्यात आला आहे. हा दस्तावेज मोफत सर्च, डाऊनलोड करता येईल. त्याची प्रिंट आवृत्तीही डिजिटल सामग्रीसह उपलब्ध आहे. जेएनएमएफच्या मते, 1920 ते 1960 या कालखंडातील इतिहासाच्या कोणत्याही पैलूचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी हा संग्रह खूप उपयुक्त आहे. उपलब्ध कागदपत्रांमध्ये नेहरूंनी लिहिलेल्या पत्रांचा अधिकतर समावेश आहे, असे जेएनएमएफचे विश्वस्त, जयराम रमेश म्हणाले.
ऑनलाईन संग्रहात काय?
35 हजार कागदपत्रे आणि 3 हजार छायाचित्रे. खंड 44 नंतर सप्टेंबर 1958 पासून पंडित नेहरूंचे हिंदी भाषण आणि त्याचा इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे. असे एकूण 100 खंड डिजिटल स्वरूपात असतील.





























































