चीनची कॉकरोच कॉफी चर्चेत, करपट आंबट चवीची तरुणाईला भुरळ

चीनमधील अनोख्या खाण्यापिण्याच्या सवयी कायम चर्चेत असतात. आता पुन्हा चीन चर्चेत आले आहे ते अनोख्या कॉफीमुळे. बीजिंगच्या एका म्युझिअममध्ये झुरळ आणि मीलवर्म पावडरपासून बनलेली कॉकरोच कॉफी तरुणांना आकर्षित करत आहे. त्यामुळे चीनमधील ही अनोखी कॉफी जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.

ही अनोखी कॉफी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही कॉफी झुरळ आणि सुख्या मीलवर्म पावडरपासून बनवण्यात आली आहे. या कॉफीची किंमत जवळपास 565 रुपये आहे. या कॉफीला तरुणाईने पसंती दिली आहे. द कव्हरच्या वृत्तानुसार, या कॉफीची टेस्ट थोडी करपट आणि थोडी आंबट अशी आहे. बीजिंगमधील एका इंसेक्ट-थीम असलेल्या म्युझियममधील एका कॉफी शॉपमध्ये झुरळांनी भरलेली कॉफी मिळते. मात्र या वृत्तात म्युझियमच्या नावाचा उल्लेख नाही. नावाचा उल्लेख केलेला नाही. कॅफेमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ही नवीन कॉफी या वर्षी जूनमध्ये लाँच करण्यात आली होती. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

म्युझियमच्या कॅफेमध्ये दररोज 10 कपांपेक्षा जास्त कॉफी विकली जात असल्याचे म्हटले जाते. साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका वृत्तानुसार, संपूर्ण चीनमध्ये अनोख्या कॉफी रेसिपी ट्रेंडिंगमध्ये आहेत.