सूर्य कांत उद्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश सूर्य कांत हे उद्या, सोमवारी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते 53 वे सरन्यायाधीश बनतील. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपत असून 24 नोव्हेंबरला सूर्य कांत हे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. हा शपथविधीचा सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेच्या मुख्य न्यायाधीश व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत हे 24 नोव्हेंबरला सरन्यायाधीश बनल्यानंतर ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ अंदाजे 14 महिन्यांचा असणार आहे.