
गेल्या काही दिवसांत उच्चांकावर पोहोचलेल्या चांदीचे दर हळू हळू खाली येताना पाहायला मिळत आहेत. मागील आठवडय़ात चांदीच्या दरात घसरण झाली असून चांदी तब्बल 8 हजारांनी स्वस्त झाली आहे. चांदीचा दर 1 लाख 54 हजार 52 रुपये इतका खाली आला आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत तेजी येण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडय़ात चांदीच्या दरात देखील मोठी घसरण निर्माण झाली आहे. कमोडिटी एक्सचेंज ते देशांर्गत बाजारात चांदीची घसरण पाहायला मिळत असून मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर एक किलो चांदीच्या वायद्याचे दर 14 नोव्हेंबरला 1 लाख 56 हजार 18 रुपयांवर होते तर शुक्रवारी 21 नोव्हेंबरला चांदीचे दर 1 लाख 54 हजार 52 रुपये इतके आले आहेत. चांदीचे दर 1 हजार 966 रुपयांनी कमी झाले आहेत. देशांतर्गत बाजाराचा विचार केल्यास 14 नोव्हेंबरला चांदीचे दर 1 लाख 59 हजार 367 इतके होते तर 21 नोव्हेंबरला दर 1 लाख 51 हजार 375 रुपये इतके होत़े



























































