
एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता एटीएम कार्डची आवश्यकता नाही. तुम्ही घराबाहेर पडताना तुमचे डेबिट कार्ड विसरलात तर काळजी करू नका. देशभरातील बँकांनी यूपीआय कार्डलेस कॅश विथड्रॉवल फीचर सुरू केले आहे. त्यामुळे तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा भीम ऍपवरून थेट पैसे काढू शकता. हे फीचर केवळ जलद आणि सोपे नाही, तर अत्यंत सुरक्षितदेखील आहे. कारण त्यासाठी कार्ड स्वाइप करण्याची किंवा पिन टाकण्याची आवश्यकता नाही. हे स्किमिंग, कार्ड क्लोनिंग किंवा चोरीसारखे धोके पूर्णपणे काढून टाकते.
या फीचरला आयसीसीडब्ल्यू (इंटरोपेरेबल कार्डलेस कॅश विड्रॉवल) असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही एटीएममध्ये जाता तेव्हा स्क्रीनवर ‘यूपीआय कॅश विथड्रॉवल’ किंवा ‘आयसीसीडब्ल्यू’ पर्याय निवडा. त्यामुळे एटीएम कार्डशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. एटीएम एक क्यूआर कोड जनरेट करते, जो तुम्ही तुमच्या यूपीआय ऍपने स्कॅन करता. त्यानंतर तुमचे बँक खाते निवडा आणि तुमचा यूपीआय पिन एंटर करा.
यूपीआय वापरून पैसे कसे काढायचे?
जवळच्या यूपीआय-समर्थित एटीएमवर जा.
स्क्रीनवर ‘यूपीआय कॅश विथड्रॉवल’ किंवा ‘आयसीसीडब्ल्यू’ असा पर्याय निवडा.
एटीएमवर दिसणारा क्यूआरकोड तुमच्या मोबाईलने स्कॅन करा.
तुमच्या यूपीआय ऍपमध्ये पिन टाकून पेमेंटची निश्चिती करा.
व्यवहार यशस्वी झाल्यानंतर एटीएममधून रोख रक्कम काढली जाईल.
मर्यादा आणि अटी
एटीएममध्ये यूपीआय ऍप वापरून तुम्ही प्रति व्यवहार जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकता. फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीमद्वारे ‘यूपीआय कॅश विथड्रॉवल’ असे फीचर वापरू शकता. हे फीचर फक्त आयसीसीडब्ल्यू-सक्षम एटीएममध्ये उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक एटीएमवर ही सुविधा उपलब्ध नसेल.
जलद आणि सुरक्षित
100 टक्के कार्डलेस सुरक्षाः कार्ड हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती नाही.
स्किमिंगपासून किंवा क्लोनिंगपासून संरक्षण
फक्त तुमचा मोबाईल स्कॅन करा आणि पैसे काढा.
कोणत्याही बँकेचे ग्राहक इंटरऑपरेबल सिस्टमद्वारे या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.




























































