कर्नाटक सत्तासंघर्ष: काँग्रेसमधील संकट गडद; शिवकुमार गटाचे आमदार दिल्लीत, मंत्री परमेश्वरही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

Karnataka Congress Crisis Deepens Shivakumar Camp MLAs in Delhi G Parameshwara Joins CM Race

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना आव्हान देत, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटाचे आमदार नेतृत्त्वबदलाची मागणी करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

या राजकीय परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनीही स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे घोषित केल्याने अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. या संपूर्ण गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘हाय कमांडच्या’ सल्ल्यानुसारच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अंतर्गत वादामुळे राज्याच्या प्रशासनावर परिणाम झाला आहे. विरोधी पक्ष भाजपने असा दावा केला आहे की मंत्रिमंडळाचे सदस्य आणि आमदार नेतृत्त्वबदलाच्या संकटात व्यस्त असल्याने राज्यातील प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे.