Ashes 2025 – ऑस्ट्रेलियाला वेगवान माऱ्याची कमतरता जाणवणार! दुसऱ्या कसोटीतून घातक गोलंदाज बाहेर

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये अ‍ॅशेज मालिकेतील दुसरा कसोटी सामना 4 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबामध्ये खेळला जाणार आहे. पहिला सामना जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या सामन्यातही त्याच जोशात मैदानात उतरेल, तर इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा धाक पाहायला मिळाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही दोन्ही संघांना वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षा असणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा घातक वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूडने दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातूनही माघार घेतली आहे.

अ‍ॅशेज मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवशीच तब्बल 19 विकेट पडल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी आपल्या तिखट माऱ्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना मैदानावर फारकाळ टिकू दिले नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही गोलंदाजांवर चाहत्यांचा नजरा खिळून असणार आहेत. मिचेल स्टार्क आणि बेन स्टोक्सने कहर बरसवणारी गोलंदाजी केली. जॉश हेझलवूड सुद्धा त्याच ताकदीचा अनुभवी गोलंदाज आहे. दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना त्याला खेळता आला नाही. दुसऱ्या कसोटीत तो मैदानात उतरेल, अशी संघाला अपेक्षा होती. परंतू दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला खेळता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अ‍ॅड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला आशा आहे की जॉश उर्वरित तीन सामन्यांसाठी उपलब्ध असेल. तो सध्या मैदानात परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. जॉश हेझलवूड पॅट कमिन्स सुद्ध पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी पॅट कमिन्स सध्या नेट्समध्ये घाम गाळत आहे. मात्र, तो दुसरा कसोटी सामना खेळणार का नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

IND Vs SA 2nd Test – दक्षिण आफ्रिकेला नमवण्यासाठी रवी शास्त्रींचा टीम इंडियाला अनोखा सल्ला, आता सामना जिंकणार?