हृदयविकाराचा झटका आणि 14 वर्षांचा फुटबॉलर मैदानातच कोसळला, हरहुन्नरी मुलगा गेल्याने कुटुंब हादरलं

मैदानात फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका 12 वर्षीया मुलाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मैदानात खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन अनेक तरुणांचे मृत्यू झाले आहेत. अशातच पुन्हा एकदा एका 14 वर्षीय मुलाचा मैदानातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली असून मुलाच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ETV Bharat ने दिलेल्या वृत्तानुसार, 14 वर्षीय मोहम्मद फैजलला फुटबॉलची प्रचंड आवड होती. त्यामुळे फुटबॉल खेळण्यासाठी तो नेहमी मैदानात जात असे. रविवारी (23 नोव्हेंबर 2025) सकाळी नेहमी प्रमाणे तो सुकमा येथील छिंदगड मैदानामध्ये खेळण्यासाठी गेला होता. परंतू वॉर्मअप सुरू करत असतानाच तो मैदानात कोसळला. त्याला तात्काळ छिंदगड रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांना त्याला वाचवण्यात यश आले नाही. डॉक्टरांनी मोहम्मदचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. परंतू पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. मोहम्मदच्या मृत्यूने कुटुंबर पूर्त हादरून गेलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बस्तर ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने मेडलही जिंकले होते. त्यामुळे एक हुशार आणि चांगला खेळाडू गमावल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.