यंदा चारधाम यात्रेत 50 लाख भाविक पोहोचले

उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षीची चारधाम यात्रा अधिकृतरीत्या बंद झाली. यंदा 50 लाखांहून अधिक भाविकांनी चारधाम यात्रा केली. ही यात्रा अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडल्याने सुरू झाली होती, तर बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद झाल्याने ही यात्रा बंद झाली. या वर्षी यमुनोत्री धाममध्ये 6.44 लाख, गंगोत्री धाममध्ये 7.58 लाख, केदारनाथमध्ये 17.68 लाख आणि बद्रीनाथमध्ये 16.47 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे.