
आर्मेनियाने हिंदुस्थानकडून तेजस फायटर जेट खरेदी करण्याची चर्चा तूर्तास थांबवली आहे. दुबई एअर शोमध्ये तेजस विमान व्रॅश झाल्यानंतर आर्मेनियाने हा निर्णय घेतला आहे. या अपघातात हिंदुस्थानी पायलट विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला होता. आर्मेनिया हिंदुस्थानकडून जवळपास 1.2 अब्ज डॉलर अर्थात 10 हजार कोटी मध्ये 12 तेजस विमाने खरेदी करण्याच्या तयारीत होता. हा करार अंतिम टप्प्यात होता, परंतु तेजसला अपघात झाल्यानंतर हा करार थांबवण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आर्मेनिया सरकारने कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.



























































